जवळपास सात वर्षांनी अक्षय कुमार आणि एकता कपूर पुन्हा एकत्र काम करणार?

By  
on  

अक्षय कुमार एक हरहुन्नरी कलाकार आहे. सिनेमाचा कोणताही जॉनर असुदे अक्षय त्यात परफेक्ट सामावून जातो. अक्षय आता रोहीत शेट्टीच्या ‘सुर्यवंशी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय अशी बातमी समोर येताना दिसत आहे की, अक्षय आता एकता कपूरसोबत दिसणार आहे. 

‘मुंबई मिरर’ नुसात अक्षय आणि एकता जवळपास सात वर्षांनी एकत्र काम करताना दिसणार आहेत. यापुर्वी हे दोघं 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या सिनेमात दिसले होते. या सिनेमाचं दिग्दर्शन मिलन लुथरियाने केलं होतं. या सिनेमाची स्क्रिप्ट अजून फानयल केली नाही. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा एका नवीन दिग्दर्शकाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

Recommended

Loading...
Share