By  
on  

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचं सिनेमात कमबॅक, वाचा सविस्तर

बॉलिवूडमधील शिरोडकर बहिणींना कोण कसं विसरु शकेल. शिल्पा शिरोडकर आणि नम्रता शिरोडकर या भगिनींनी आपल्या   90 च्या दशकांत आपल्या निवडक सिनेमांमधून अभिनयाची छाप पाडली. 'गोपी किशन ' 'हम', 'आंखें', 'बेवफा सनम' आणि  'खुदा गवाह' सारख्या सिनेमांमधून लक्षवेधी भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ब-याच काळ मोठ्या पडद्यापासून दूर आहे. काही वर्षांपूर्वी हिंदी टीव्ही मालिकांमध्ये ती झळकली होती. पण आता लवकरच ती कमबॅकसाठी सज्ज होते आहे. 

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत, " 2000 साली माझं लग्न झाल्यानंतर पती आणि मी पाच वर्ष लॉंग डिस्टन्समध्ये राहत होतो. त्यानंतर मी पुन्हा दुबईला निघून गेले. तिथे कुटुंबियांसोबत मी आनंदात होते, पण माझ्या कामाची मला सतत आठवण यायची. मी मध्यंतरी काही वर्षांपूर्वी दोन हिंदी टीव्ही मालिकांमध्ये पण काम केलं आहे." 


 
शिल्पाला आता पुन्हा हिंदी सिनेमात काम करायचंय पण त्याबाबत स्पष्ट करताना ती सांगते, " माझ्या वेळेचा सिनेमा आणि आत्ताचा सिनेमा यात खुप फरक पडला आहे. अनेक बदल घडले  आहेत. आता लोक खुप प्रोफेशनल बनले आहेत. 1990 साली आम्ही दोन शिफ्ट्समध्ये काम करायचो. पुन्हा इंडस्ट्रीचा भाग व्हायला मला खुप आनंद होतोय. माझ्या वयाच्या अभिनेत्रींसाठी इथे विविध भूमिका साकारण्याची संधी मिळणार आहे." 

'गन्स ऑफ बनारस' या  आज 28 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमात शिल्पा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतेय. 

Recommended

PeepingMoon Exclusive