By  
on  

शिल्पा म्हणतेय ‘नको चंद्र तारे’, विराजस कुलकर्णीच्या मालिकेमधील गाण्यावर शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ 

‘माझा होशील ना’ ही नवी मराठी मालिका नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेचं टायटल साँग सध्या चर्चेत असून ‘नको चंद्र तारे’ असे या गाण्याचे बोल आहेत. मात्र नुकतीच बॉलिवुड अभिनेत्री या मालिकेच्या गाण्याच्या प्रेमात पडलीय. 


शिल्पा शेट्टी कुंद्रा ही सोशल मिडीयावर नेहमी अपडेट असते. त्यातच शिल्पाला सध्या टिक टॉक व्हिडीओ करण्याचं वेड लागलयं. आणि नुकतच शिल्पाने विराजसच्या मालिकेतील नको चंद्र तारे या गाण्यावर व्हिडीओ बनवलाय. या व्हिडीओत शिल्पाने मराठी गाण्यावर लिप सिंक केलय. टिक टॉकवर हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

या व्हिडीओचं कॅप्शनही शिल्पाने मराठीत लिहीलं असून ती म्हणते की , “कसे वाटले हाव भाव ?”

@theshilpashetty

Tumcha saathi, mi Marathi... kasha vaatle haav bhaav??? ##Marathi ##marathimulgi ##betweenshots ##fyp

♬ original sound - Zee Marathi Official

विराजसनेही जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा त्याने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवरही कौतुकाने तो पोस्ट केला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When @theshilpashetty does a TikTok video with your title song

A post shared by Virajas Kulkarni (@virajas13) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive