अक्षय कुमार म्हणतो 'फक्त नमस्कारच करुयात', जाणून घ्या

By  
on  

 संपूर्ण जगभराच करोना.व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. जिथे तिथे फक्त कोरानाचीच चर्चा सुरु आहे. करोना व्हायरची लागण सर्वप्रथम चायनामध्ये झाली आणि तिथूनच तो जगभर पसरला.  आता भारतात करोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा ४० वर पोहचला आहे. तर केरळमध्ये करोनाची लागण झालेल्यांची संख्या ९ झाली आहे. 

करोनाचा फटका सध्या सर्व  क्षेत्रांना बसला आहे. हिंदी सिनेसृष्टीलासुध्दा याचा फटका बसलाय का, याचं उत्तर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नुकतंच एका न्यूज एजन्सीसोबत बोलताना म्हणाला, "करोनाचा फटका हिंदी सिनेसृष्टीला निश्चितच बसलााय पण किती ते सांगता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनीसुध्दा सांगितलंय, की नागरिकांनाी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं."

तसंच तो पुढे म्हणतो, सर्वांनी मूलभूत स्वच्छता राखणं गरजेचं आहे. तसंच सर्वांना स्वच्छतेबाबत जागरुक करणंसुध्दा गरजेचं आहे.  काही लहान-लहान गोष्टींंमधून आपण नियम पाळायला हवेत, हस्तांदोलनाऐवजी नमस्ते करायला हवं". 

Recommended

Loading...
Share