By  
on  

होळीच्या आठवणी शेअर करताना दीपिका म्हणते, 'त्यांनी आमच्यावर अंडी फेकून मारली'

होळी म्हणजे आठवणींचा खजिना. प्रत्येकाच्या होळीसोबत अनेक चांगल्या-वाईट आणि मनाला स्पर्शून जाणा-या काही आठवणी जोडलेल्या असतात. मग दरवर्षी होळीला त्या आठवणींना उजाळा मिळतो. सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींच्या खास आठवणी असतीलच व चाहत्यांना मात्र त्या जाणून घेतल्याशिवाय चैन पडणार नाही. 

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणनेसुध्दा तिची मुंबईतील होळीची एक अविस्मरणीय आठवण नुकतीच शेअर केली आहे. हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दीपिका सांगते," मी दक्षिण भारतीय असल्याने आमच्याकडे होळीचं इतकं महत्त्व नाही. पण मुंबईत होळी मोठ्या प्रमाणावर आणि जल्लोषात साजरी होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी मुंबईत नवीन होते. एका जाहिरातीच्या ऑडीशननिमित्ताने मी आईसोबत एका दिवसासाठी मुंबईत आले होते व तो नेमका होळीचा दिवस होता. सकाळी ऑडीशन झाल्यानंतर मी व आईने पेडर रोड येथील आमच्या एका नातेवाईकांकडे जाण्याचं ठरवलं. " 

दीपिका पुढे सांगते," आम्ही टॅक्सीने जात होतो. नातेवाईकांचं घर रस्त्याच्या पलिकडे होतं, पण टॅक्सीला त्यासाठी यू टर्न घेणं आवश्यक होतं. म्हणूनच मी आईला टॅक्सीतून उतरुन पायी रस्ता ओलांडूया असं म्हटलं. त्याप्रमाणे आम्ह उतरलो व रस्ता ओलांडू लागलो.  मात्र रस्त्यावर कोणीही नव्हतं. आम्ही रस्ता ओलांडून पलिकडे जात  असताना काही मुलांनी आमच्यावर अंडी फेकली. त्यातलं एक अंड आईच्या कपड्यांवर फुटलं. आम्ही एका दिवसासाठी मुंबईत आल्याने कपडेच आणले नव्हते. त्यामुळे बिचा-या आईला तसंच घरी परतावं लागलं व पूर्ण परतीच्या प्रवासात अंड्याची दुर्गंधी येत होती."

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive