करोनाचं सावट, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये

By  
on  

करोनाने जगभर थैमान घातलं आहे. अवघ्या जगावर याचं संकंट आहे आणि तूर्तास तरी ते टळण्याची चिन्ह फार कमी आहेत. सर्वच दैनंदिन व्यवहार आणि कार्यालयीन कामे, सार्वजनिक सेवा यामुळे ठप्प झाल्या आहेत. सिनेसृष्टीलासुध्दा याचा मोठा फटका बसला आहे. 

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ह्यांची वयोमानामुळे प्रकृती नेहमी नाजूक असते, म्हणूनच त्यांना करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पूर्व-खबरदारी घेण्यात आली आहे. त्यांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलीप कुमार यांना यापूर्वी अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू या त्यांची नेहमीच सुश्रूषा करताना पाहायला मिळतात. त्यांची खंबीर साथ दिलीप कुमार यांना मिळते. 

97 वर्षीय दिलीप कुमार हे आजही चाहत्यांच्या मनावर त्यांच्या सिनेमांमधून आणि अजरामर भूमिकांमधून अधिराज्य गाजवतात. सिनेसृष्टीतलं त्यांचं योगदान अतुलनीय आहे. 

Recommended

Loading...
Share