धकधक गर्ल माधुरीही करतेय कोरोनापासून असा बचाव, फोटो केला पोस्ट 

By  
on  

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर बहुतांश लोकांनी घरी राहणचं पसंत केलं आहे. त्यातच मनोरंजन विश्वातील सगळं चित्रीकरणही 19 मार्च ते 31 मार्च या दरम्यान बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे काही कलाकारांनी आधीच चित्रीकरण संपवून घरी राहणं पसंत केलयं. या निमित्ताने चित्रीकरणात व्यस्त असणाऱ्या कलाकारांना घरी राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवायला मिळतोय. सोशल मिडीयावरही अशा पोस्ट सध्या पाहायला मिळत आहेत. कलाकार मंडळी घरात बसून आपले छंद जोपासत आहेत तर काही आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. 

 धकधक गर्ल माधुरीही याला अपवाद नाही. माधुरीनेही घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवणं पसंत केलं आहे. तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर माधुरीने फॅमिलीसोबतचा सेल्फि पोस्ट केला आहे.
शिवाय माधुरीने सगळ्यांना सावधगिरी बाळगण्याचाही सल्ला दिला आहे. सगळ्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा असं म्हणत तिने या फोटोला कॅप्शन दिलय. 

 

Recommended

Loading...
Share