By  
on  

अक्षय कुमारनंतर वरुण धवनही पुढे सरसावला, करोनाग्रस्तांसाठी केली इतकी मदत

 सध्या करोनाच्या रुग्णांचा वाढता प्रभाव पाहता. आरोग्य संसाधनांची मदत मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. यासाठी गरजेचा आहे तो निधी. करोनाग्रस्तांसाठी असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये भर घालण्यासाठी अनेक कलाकार पुढे येत आहेत. अभिनेता वरुण धवन त्यापैकीच एक आहे. 

 

 

वरुणने सरकारच्या सहायता निधीस जवळपास 55 लाखांची मदत देऊ केली आहे. त्यापैकी 30 लाखांची मदत त्याने पंतप्रधान सहायता निधीस देऊ केली आहे. तर 25 लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे. वरुण पुर्वी अभिनेता अक्षय कुमारनेही 25 कोटींची मदत पंतप्रधान मदत निधीसाठी दिली आहे. या मदतीचा उपयोग करोना रुग्णांसाठी तर केला जाईलच. याशिवाय करोनामुळे ज्यांचा उदरनिर्वाह थांबला आहे. अशा रोजंदारीवरील मजुरांसाठीही हा निधीचा वापर केला जाईल.

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive