By  
on  

पीएम रिलीफ फंडसाठी मोठं योगदान दिल्यानंतर अक्षय म्हणतो, 'माझ्या आईकडून भारतमातेसाठी'

संपूर्ण देश करोनाच्या विळख्यात असताना या अस्मानी संकटाशी लढण्यासाठी मदतीचा मोठा हात देणा-या बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या दानशूरपणाचा प्रत्यय आला. २८ मार्च रोजी अक्षय कुमारने सोशल मिडीयावरुन आपण पंतप्रधान सहाय्य निधीसाठी २५ कोटी रुपये देत असल्याचे  जाहीर केले.  आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी या करोनाच्या संकटातून सावरण्यासाठी सरकारला मदतीचा हात दिला आहे, पण या सर्वांत अक्षयने केलेल्या मदतीची रक्कम ही खुप मोठी आहे. त्यामुळे त्याचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “हे योगदान माझं नाही तर माझ्या आईकडून भारत मातेसाठी आहे.” सर्व सेलिब्रिटींसमोर तु एक उदाहरण झाला आहेस, या प्रश्नावर अक्षय सांगतो, “मी कोण आहे, दान करणारा.  एका आईने दुस-या आईला दिलेलं हे योगदान आहे. “

अक्षयला पुढे हे स्पष्ट करावंसं वाटतं, “कोरानाच्या  सावटामुळे वरिष्ठ नागरिकांना डावललं जाईल, अशी संपूर्ण जगात सध्या एक प्रकारची भिती निर्माण झाली आहे. पण ते असा विचारच कसा करु शकतात की, अशा संकटसमयी आपण त्यांना एकटं सोडू शकतो. माझ्या आईचा जीव माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. तुमच्या आई-वडीलांचासुध्दा जीव तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या संकटकाळी प्रत्येक जीव वाचवायला पाहिजे. यासाठी मी माझ्यापध्दतीने छोटंसं योगदान केलं आहे.’
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive