By  
on  

सध्याच्या कालवधीत महाभारताचं प्रक्षेपण किती योग्य आहे हे सांगतात नितीश भारद्वाज

सध्या करोनाच्या प्रकोपामुळे सगळा देश लॉकडाऊनमध्ये आहे. अशा वेळी नागरिकांचं मनोरंजन व्हावं यासाठी महाभारत आणि रामायण या मालिका पुन्हा प्रसारण मंत्रालयाने पुन्हा सुरु केल्या आहेत. यावेळी महाभारतच्या परत सुरु होण्यावर यात श्रीकृष्ण साकारणारे नितीश भारद्वाज यांनी त्यावर मत व्यक्त केलं आहे.

 

एका पोस्ट केलेल्या व्हिडियोमध्ये नितीश म्हणतात, ‘ लॉकडाऊन ही एक संधी आहे असं समजून चाललं तर आपल्याला त्याचं ओझं जाणवणार नाही. पंतप्रधान मोदींनी संयम आणि संकल्प यांच्यासोबत मी आणखी एक शब्द जोडू इच्छितो की, स्वाध्याय.हे लॉकडाऊन आपल्यात डोकाऊन बघण्याची संधी आहे.

महाभारतातील खांडववनाच्या अध्याय या ठिकाणी चपखल लागू पडतो. पांडवांनी इंद्रप्रस्थसाठी खांडववन जाळलं. पण त्याची किंमत परिक्षित राजाला त्याच्या प्राणांची किंमत देऊन चुकवावी लागली. त्यामुळे ही परिस्थिती आपल्याला निसर्गाचा आदर करण्यासाठी शिकवत आहे.     त्याकडे आपण लक्ष देणं गरज आहे. नाहीतर आपल्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल.’ नितीश सध्या ‘समांतर’ या वेबसिरीजमधून चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. या वेबसिरीजमध्ये ते सुदर्शन चक्रपाणी नावाची व्यक्तिरेखा साकारत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive