By  
on  

सलमानची अशीही दानशुरता केलं हे काम

सध्या सर्वत्र चर्चेत असलेलं एकच नाव म्हणजे करोना. या नावाने प्रत्येकाला आज दहशतीत ठेवलं आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपुर्ण देश सध्या लॉकडाऊनच्या छायेत आहे. देशातील अनेक नांदते उद्योग करोनाच्या सावटामुळे बंद आहेत. अशा वेळी हातावर पोट असलेल्या मजुरांची स्थिती याहून कठीण झाली आहे. अशा वेळी त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. 

 

 

यापैकीच एक आहे अभिनेता सलमान खान. सलमानने आतापर्यंत अनेकदा समाजातील वंचित घटकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पण याची जाहीर वाच्यता केली नाही. आताही सलमान मजुरांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. सलमानने जवळपास 25 हजार कामगारांची जबाबदारी स्विकारली आहे. लॉकडाऊन कमी होईपर्यंत सलमान सर्व कामगारांचा राहण्याचा, खाण्या-पिण्याचा आणि औषधांचा खर्च उचलणार आहे. एकंदरीत सलमान या कामगारांसाठी महिन्याभरात जवळपास 25 कोटी रुपये खर्च करणार आहे. स्वत: सलमानने याबाबत वाच्यता केली नसली तरी दिग्दर्शक निखिल अडवाणीने ही बाब जाहीर केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive