सलमान खानच्या पुतण्याचं फुफ्फुसाच्या संसर्गाने झालं निधन

By  
on  

सध्या जगभर करोनाचं सावट पसरलं असताना बॉलिवूड भाईजान सलमानच्या घरी मात्र शोककळा पसरली आहे.सलमान खान याच्या पुतण्याचं निधन झालं आहे. सलमाननेच ट्विट करत अब्दुल्लाह खान याचं निधन झाल्याचं सांगितलं. अब्दुल्लाह खान हा सलमानच्या चुलतभावाचा मुलगा होता. सलमानने पुतण्याचा फोटो शेअर करत ही निधनाची वार्ता दिली. 

अब्दुल्लाहच्या फुफ्फुसाला संसर्ग झाल्यामुळे त्याचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. फुफ्फुसाला संसर्ग झाल्यामुळे त्याच्यावर मुंबईतील कोकिला धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

सलमानसोबत अब्दुल्लाह ब-याच व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला आहे. 
 

Recommended

Loading...
Share