By  
on  

खुशखबर ! आता होणार हास्याचा धमाका , 'देख भाई देख'सुध्दा होणार पुन्हा प्रदर्शित

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर कला विश्वाचं चित्रीकरणही ठप्प झाल आहे. त्यामुळे काही गाजलेल्या मालिकांचे रिपीट टेलेकास्ट सध्या टेलिव्हिजनवर पाहायला मिळतय. त्या मालिका लोकाग्रहास्तवच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आल्या आहेत. जुन्या मालिकांच्या आठवणीत रममाण होऊन हा वेळ सत्कारणी लावायचा असं जणू प्रेक्षकांनी ठरवूनच टाकलंय.

८०-९० च्या कालातील आयकॉनिक मालिका या दरम्यान रसिकांच्या भेटीला येत आहेत. रामायण, महाभारत, सर्कस, शक्तिमान तर मराठीत गुंड्याभाऊ चिमणराव, यांच्यानंतर आता हास्याचे फवारे उडवण्यासाठी देख भाई देख ही मालिका पुन्हा प्रदर्शित होणार आहे. 

दूरदर्शन नॅशनलने ट्विटरद्वारे हि माहिती प्रेक्षकांना दिली आहे. आता आयकॉनिक कॉमिक शो ‘देख भाई देख’ मध्ये दिवान कुटुंबातील तीन पिढ्यांमधील नाते पुन्हा पाहायला मिळणार आहे. हा शो संध्याकाळी ६ वाजता फक्त दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.

 

त्यामुळे आता जुन्या नव्या पिढीमध्ये पुन्हा एकदा त्या आठवणींमध्ये रममाण होण्याची उत्कंठा वाढली आहे. लाडक्या मालिका पुन्हा अनुभवयाला मिळतायत याचा प्रेक्षकांना आनंद होतोय. 

Recommended

PeepingMoon Exclusive