पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी करिना व सैफ अलीखानने दिलं योगदान

By  
on  

करोना संकटामुळे संपूर्ण देश संकटात सापडला आहे. करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी व इतर सुविधांसाठी देशभरातील मान्यवर उद्योगपी व सेलिब्रिटींकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. अनेकांनी सरकारी यंत्रणांना मदत म्हणून खारीचा वाटा उचलला आहे. लता मंगेशकर, विकी कौशल आदींनंतर बॉलिवुडचं प्रसिध्द सेलिब्रिटी कपल करिना कपूर खान व सैफ अली खान यांनीसुध्दा पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आपलं योगदान दिलं आहे, मात्र त्यांनी आपल्या धनराशीचा खुलासा केलेला नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

काल करिनाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन माहिती देत सांगितलं होतं की, ती युनिसेफसह इतर आंतरराष्ट्रीय संस्थांना मदत करणार आहे. त्यानंतर तिला चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. देशवासियांप्रतीही तिचं कर्तव्य आहे असे फॅन्स कॉमेंट्समध्ये सांगत होते. त्यानंतर आता काही वे ळापूर्वीच सैफ, करिना व तैमूर यांच्याकडून पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  योगदान दिल्याची पोस्ट पाहायला मिळाली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

 

करिनाप्रमाणेच तिची बहिण अभिनेत्री करिश्मा कपूरनेही सहाय्यता निधीसाठी काही रक्कम दिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

We donated , please donate too.. a small contribution can help so many lives.. #indiafightscorona #jaihind

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

Recommended

Loading...
Share