पाहा Video :रितेश देशमुखने अजय देवगणला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

By  
on  

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशभरात लॉकडाउन आहे. यातच कुणाचा वाढदिवस साजरा करायचा झाला तर तो घरातच साजरा करावा लागतोय. आता वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या कशा ? तर अर्थात मोबाईलद्वारे या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र वाढदिवसाच्या  शुभेच्छा देण्याची हटके पद्धत अभिनेता रितेश देशमुखने शोधून काढलीय. 

या क्वारंटाईनच्या वेळेत रितेश देशमुख आणि जेनेलिया ही जोडीही घरातच आहे. रितेश देशमुख सध्या जेनेलियाला कामातह मदत करतोय. त्यातच अभिनेता अजय देवगणला या दोघांनी हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अजय देवगणच्या 'दिलवाले' या सिनेमातील 'मौका मिलेगा तो हम बता देंगे' या प्रसिद्ध गाण्यावर रितेश-जेनेलियाने व्हिडीओ केला आहे. सध्या क्वारंटाईनच्या काळात घरात बसून पत्नीला मदत करावी लागत असल्याने रितेश स्वयंपाक घरात भांडी घासताना या व्हिडीओमध्ये दिसतोय. अजय देवगणच्या वाढदिवसानिमित्ताने हा खास मजेशीर व्हिडीओ या दोघांनी केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Gudi Padwa

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

सोशल मिडीयावर या व्हिडीओला प्रचंड लाईक्स मिळत आहेत. आणि रितेश-जेनेलियाच्या भावना या व्हिडीओतून अजय देवगण पर्यंत नक्की पोहोचल्या असतील यात शंका नाही. सध्या घरात बसून रितेश आणि जेनेलिया दोघही टिक टॉक ऐपवर विविध व्हिडीओ बनवत आहेत. त्यांच्या या मजेशीर व्हिडीओजला सोशल मिडीयावर चांगला प्रतिसाद मिळतोय. 

Recommended

Loading...
Share