By  
on  

“ह्या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत”, किंग खान शाहरुखने केलं मराठी भाषेत ट्विट 

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलिवुडकरांसह मराठी कलाकारही पुढे येत आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीसाठी विविध क्षेत्रातून मदत येत असताना कला विश्वातील कलाकारही पुढे सरसावले आहेत. यात किंग खान शाहरुख खान का पुढे येत नाही असाही सवाल विचारण्यात येत होता. मात्र नुकतच शाहरुखनेही मदतीचा हात पुढे केला आहे. 

शाहरुख खानने केलेल्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहरुख आणि गौरी खानचे आभार मानणारं ट्विट केलं आहे. या ट्विटला उत्तर म्हणून शाहरुखने चक्क मराठीत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये शाहरुख मराठीत लिहीतो की, “ह्या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत कारण थेंबे थेंबे तळे साचे. सर्वांनी थोडे थोडे प्रयत्न केले तर एक मदतीचा महासागर तयार होईल.. आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद!“ 

किंग खान शाहरुखला मराठी भाषा कळते मात्र ती बोलायला कठीण जात असल्याचं त्याच्या काही मराठी मुलाखतीत पाहायला मिळालं आहे. मात्र शाहरुख मराठी मुलाखतींमध्ये किंवा मराठी कार्यक्रमांमध्ये मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. शाहरुखच्या या मराठी ट्विटमुळे त्याच्या मराठी भाषीक चाहत्यांना मात्र चांगलाच आनंद झाला आहे. 

बऱ्याच दिवसांपासून शाहरुख मदतीसाठी पुढे आला नसल्याने त्याला ट्रोल केलं जात होतं. मात्र शाहरुखने त्यांच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंट, रेड चिलीज विएफएक्स, आयपीएल क्रिकेट टीम कोलकाता नाईट रायडर्स आणि मीर फाउंडेशन या कंपन्यांच्या माध्यमातून मदत जारी केली आहे. तो यासगळ्यात कशाप्रकारे मदत करणार याचा संपूर्ण तपशील असलेलं दोन पानांचं स्टेटमेंट ट्विटही केलं आहे.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive