Video : दीपिकाने स्वत: बनवला पती रणवीरसाठी स्वादिष्ट स्वयंपाक

By  
on  

सध्या देशभर २१ दिवसांचा लॉकडाऊन काळ सुरु आहे. कोणालाही  अत्यावश्यक सेवा व वस्तू आणण्याशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे  आज सर्वचजण आपापल्या घरी कैद आहेत. याला सेलिब्रिटीसुध्दा अपवाद नाहीत. या क्वारंटाईनमध्ये आपण सर्वजण बरंच काही शिकतोय. 

कोणी वाचन करतोय, कोणी घरकामात व्यस्त आहे तर कोणी छंद जोपासतोय. बॉलिवूडचं सर्वात हॉट आणि लाडकं कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हेसुध्दा आनंदात एकमेकांसोबत वेळ घालवतायत. काय तर म्हणे..दीपिकाने स्वत: पती परमेश्वर रणवीरसाठी स्वयंपाक बनवला. मग पतीदेवांची स्वारीसुध्दा खुश झाली, म्हणाले बेबी तुच माझं  प्रेम आहेस. 

खुद्द रणवीरनेचं आपल्या इन्स्टाग्रामवरुन पत्नी दीपिकाने आपल्यासाठी अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवल्याचं सांगितलं. यात तिने थाई ग्रीन करी , राईस, व्हेजिटेबल सूप आणि सलॅड असे तिने पदार्थ बनवले होते. 

म्हणतात ना, प्रेमाचा मार्ग हा पोटातून जातो. दीपिकाने हेच हेरलं आणि पती परमेश्वरला खुश केलं...आणि काय हवं!

Recommended

Loading...
Share