घरच्यांपासून दूर असलेल्या सलमानला आता वाटतेय भीती, शेअर केला हा व्हिडीओ

By  
on  

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. करोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दररोज नवी आकडेवारी आपल्यासमोर प्रसिध्दी माध्यमांकडून समजते. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता देशा्तील प्रत्येक नागरिक स्वत:च्या घरात सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. 

या लॉकडाऊन दरम्यान बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानसुध्दा त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. त्याच्यासोबत फक्त त्याचा पुतण्या म्हणजेच भाऊ सोहेल खानचा मुलगा निर्वान खान आहे.  व्हिडिओत सलमान सांगतो की, गेल्या तीन आठवड्यांपासून आम्ही कुटुंबापासून लांब आहोत आणि घाबरलो  आहोत.  'आम्ही हिम्मतीने बोलतो बोलतो की हो आम्ही घाबरलो आहोत.'

सलमान पुढे व्हिडीओत निर्वानला विचारतो, किती दिवस तु तुझ्या बाबांना पाहिलं नाहीस. यावर निर्वानने तीन आठवड्यांपासून बाबांना पाहिलं नसल्याचं सांगितलं. यानंतर सलमाननेही त्याच्या वडिलांना तीन आठवड्यांपासून पाहिलं नसल्याचं स्पष्टे केलंय. 

 

सलमान खानचं संपूर्ण कुटुंब हे वांद्रे येथील हिल रोडवर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे. पण आता लॉकडाऊन काळात सलमान व पुतण्या निर्वान हे पनवेलच्या फार्महाऊसवर आहेत. 

व्हिडिओच्या शेवटी सलमान खान म्हणतो की, 'या सर्व गोष्टीचं तात्पर्य हे आहे की, जो घाबरला तो वाचला आणि त्याने अनेकांचं आयुष्यही वाचवलं.' सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

 

Recommended

Loading...
Share