अमिताभ बच्चन यांची उदारता, केली इतकी मदत

By  
on  

सध्या सगळीकडे करोनाचीच चर्चा आहे. कमी वेळात संसर्ग होत असलेल्या या रोगमुळे प्रत्येकजण धास्तावला आहे. करोनामुळे अनेकांनी एकतर सुट्टी घेतली आहे. पण सामान्य माणासाची आर्थिक गणितं मात्र करोनामुळे पुरती कोलमडली आहेत. यात अवघड आहे ते रोजंदारीवर काम करणा-या कामगारांचं. सिनेसृष्टीतही रोजंदारीवर काम करणा-या वर्कर्सची संख्या खुप आहे.

 

 

देशात सर्वप्रथम बंदी आली ती सिनेमागृहांवर, त्यानंतर सिनेमा, मालिका आणि वेबसिरीजचं शुटिंगही बंद झालं. पण यामुळे डेली वेजेस कामगारांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांसाठी अनेक कलाकार पुढे येत आहेत. त्यापैकी एक आहे अमिताभ बच्चन. बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऑल इंडिया फिल्म एम्प्लॉईजच्या (AIFEC) 1 लाख सभासदांना 1 महिन्याचं रेशन देण्याचं जाहीर केलं आहे. AIFECचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक दुबे यांनी ही माहिती दिली आहे. यासाठी AIFECने अमिताभ यांचे आभार मानले आहेत.

 

 

 

 

Recommended

Loading...
Share