By  
on  

दिग्गज कलाकारांनी घरात बसून बनवली 'फॅमिली' ही शॉर्ट फिल्म, झळकली ही मराठी अभिनेत्री

कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेदिवस वाढत चाललय. याला रोखण्यासाठी सगळ्यांनी घरात राहणं सध्या गरृजेचं आहे. म्हणूनच सध्या देशात लॉकडाउन आहे. मात्र या लॉकडाउनचा फटका बऱ्याच क्षेत्रांना बसलाय. कला विश्वाचं कामही ठप्प झालय. यातच देशातील विविध भाषीक इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार एकत्र येऊन जनजागृती करत आहेत. 

नुकताच एक व्हिडीओ बिग बी अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे 'फॅमिली' नावाची एक शॉर्ट फिल्म आहे. जी बिग बींसह काही दिग्गज कलाकारांनी एकत्र मिळून तयार केली आहे. मात्र प्रत्येक कलाकाराने आपापल्या घरात बसून ही शॉर्ट फिल्म शूट केली असल्याने ही शॉर्ट फिल्म सगळ्यांना घरात बसण्याचं आवाहन करते. या शॉर्ट फिल्ममध्ये बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, दिलजीत दोसांज, आलिया भट, रजनीकांत, प्रियांका चोप्रा, चिरंजीवी, मोहनलाल, मामुटी, सोनाली कुलकर्णी हे कलाकार आहेत. या बॉलिवुड आणि साऊथ कलाकारांसह मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही या फिल्ममध्ये झळकतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When you see that the cause is greater than the idea you dreamt of .. there is just immense joy and gratitude for all my colleagues and friends in the making of this historic effort ! WE ARE ONE and WE SHALL OVERCOME ! Jai Hind ! जब विषय देश हित का हो, और आपका संकल्प आपके सपने से भी ज़्यादा विशाल हो ; तब फिर इस ऐतिहासिक प्रयत्न का उल्लहास और कृतज्ञ भाव, अपने फ़िल्म उद्योग के सह कलाकारों और मित्रों के लिए ! हम एक हैं ... टल जाएगा, ये संकट का समाँ ! नमस्कार ! जय हिंद !

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

शिवाय या शॉर्ट फिल्मचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश आहे. फिल्म उद्योगातील कर्मचारी आणि पर डे वेतन घेणाऱ्या कामगारांसाठी या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून या कलाकारांनी एकत्र मिळून काही रक्कमही जमा केली आहे. बिग बी अमिताभ या व्हिडीओच्या पोस्टमध्ये म्हणतात की, “जब विषय देश हित का हो, और आपका संकल्प आपके सपने से भी ज़्यादा विशाल हो ; तब फिर इस ऐतिहासिक प्रयत्न का उल्लहास और कृतज्ञ भाव, अपने फ़िल्म उद्योग के सह कलाकारों और मित्रों के लिए ! हम एक हैं ... टल जाएगा, ये संकट का समाँ ! नमस्कार ! जय हिंद !”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A short film shot across cities within the nation.. featuring my colleagues from the Indian film industry... each one of us putting our individual pieces together from the safety of our respective homes. All this with ONE aim and ONE simple message... #StayHomeStaySafe. This film which transcends the borders of region and language, was also created to raise funds for our extended family, who are the backbone of the entertainment industry... the technicians and assistants who work on a daily wage basis. This is for them. Thank you @amitabhbachchan for bringing us together (virtually and with #SocialDistancing in place) and making this happen. We are one and we shall overcome! @aliaabhatt @rajinikanth @chiranjeevikonidela @mammootty @mohanlal @prosenstar #RanbirKapoor #ShivaRajkumar #PrasoonJoshi @diljitdosanjh @sonalee18588

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 
सध्या लॉकडाउनच्या काळात जनजागृती करण्यासाठी आणि घरात बसण्यासाठी ही कलाकार मंडली सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध प्रकारे आवाहन करत आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive