Lockdown : अक्षय कुमार म्हणतो, 'दिल से थॅंक यू'

By  
on  

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय भर पडतेय. व हळूहळू परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत आहे.  करोनाचा फैलाव नियंत्रणात नसल्याने महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे. लवकरच आवश्यक ती पावले उचलली जातील. करोनाच्या युध्दाशी दोन हात करण्यासाठी सर्व पोलिस दल , सरकारी यंत्रणा, रग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी. महानगर पालिकेचे कर्मचारी युधद्पातळीवर काम करतायत. तहान-भूक विसरुन ते अहोरात्र झटतायत. त्यांच्या ह्या अवरत कार्याला बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने अनोखा सलाम नुकताच आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन केला आहे. 

अक्षय म्हणतो, "दिवस-रात्र आमची काळजी घेणा-या मुंबई पोलिस, महानगरपालिका कर्मचारी, डॉक्टर नर्सेस, एनजीओचे कर्मचारी, विक्रेते, बिल्डींगचे सुरक्षारक्षक व या कार्यात स्वताच्या जीवाची पर्वा न करता झटणा-या सर्व स्वयंसेवकांना माझ्या व माझ्या परिवाराकडून 'दिल से थॅंक्यू' " हे धन्यावाद त्याने खुपच हटके स्वरुपात केलं आहे. आभाराचे एक व्हाईट बोर्ड तयार करन  व निखळ हास्यातला फोटो त्याने यावेळी पोस्ट केला आहे. 

दरम्यान तुम्हाला महितच असले करोना संकटाशी देश झुंजत अससताना या बॉलिवूडच्या अस्सल खिलाडीने २५ कोटी रुपयांची मदत पंतप्रदान सहाय्यता निधीला केली आहे. त्याच्या मनाचा असाही मोठेपणा देशवासियांना पाहायला मिळाला. 

 

Recommended

Loading...
Share