Coronavirus : अक्षयच्या दानशूरपणाचा पुन्हा प्रत्यय, पालिकेसाठी दिले तीन कोटी

By  
on  

करोना संकटाशी लढा देण्यासाठी सर्वच क्षेत्रांमधूम मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. अगदी दाक्षिणात्य कलाकारांपासून ते मराठी कलाविश्वापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी गरजूंना आणि करोना विषाणूसोबत झटणाऱ्यांसाठी सढळ हाताने मदत केली आहे.  पण यात वरचा नंबर लागतो तो बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा. पुन्हा एकदा त्याच्या दानशूरपणाचा प्रत्यय देशवासियांना आला आहे. 

पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २५ कोटी दिल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या मदतीसाठी अक्षय धावून आला आहे. त्याने तीन कोटी मुंबई महानगर पालिकेला मास्क, करोना रॅपिड टेस्ट व इतर गरजू वैद्यकीय उपकरणं  तसंच कर्मचा-यांची वैद्यकीय सुरक्षा या खरेदी करण्यासाठी ही मदत केली आहे. सिने व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी अक्षयच्या या मदतीची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. 

 

 

अक्षयने एकूण दान केलेली रक्कम ही आता २८ कोटींच्या घरात  आहे. त्यामुळे त्याने आपण देशासाठी रिअल हिरो असल्याचं सिध्द करुन दाखवलं आहे. 

 

Recommended

Loading...
Share