By  
on  

लॉकडाउनमध्ये सलमान असा घालवतोय वेळ, चक्क खाल्ला घोड्याचा चारा

लॉकडाउनमुळे सध्या सगळे घरीच आहेत. मात्र अभिनेता दबंगमिया सलमान खान त्याच्या परिवारापासून दुर पनवेल येथील फार्महाऊनमध्ये आहे. तिथे सलमान त्याचा भाचा म्हणजेच भाऊ सोहेल खानचा मुलगा निर्वानसोबत आहे. नुकताच एका व्हिडीओ पोस्ट करून सलमानने सगळ्यांत घरात बसण्याचं आवाहन केलं होतं. या व्हिडीओत निर्वानही होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Breakfast with my love...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

मात्र सध्या सलमान खानने नुकताच पोस्ट केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसमधील घोड्यासोबत आहे. सलमान त्याच्या घोड्याला चारा भरवत आहे. मात्र चारा घोड्याला भरवण्याआधी तो चारा सलमानने चक्क स्वत: खाल्ला आणि मग त्याच्या घोड्याला भरवला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करून कॅप्शनमध्ये सलमान लिहीतो की, "ब्रेकफास्ट विथ माय लव्ह "

सलमानला प्राण्यांची आवड आहे हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे. त्याच्या फार्महाऊसमधील या घोड्यांसोबत सलमान हॉर्स रायडिंगही करत असतो. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive