पाहा Video : हा आहे माधुरी दीक्षितचा डान्सिंग पार्टनर, त्याच्यामुळे  फुलतं माधुरीच्या चेहऱ्यावर हास्य 

By  
on  

सध्याच्या लॉकडाउनमध्ये घरात बसून आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधी सगळ्यांना मिळाली आहे. त्यातच बऱ्याचदा चित्रीकरणात व्यस्त असणाऱ्या कला विश्वातील कलाकारांनाही कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी आहे. यात कुणाकडे पाळीव प्राणी असतील तर घरी त्यांच्यासोबतही वेळ घालवला जात आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षितही प्राणीप्रेमी आहे. माधुरीकडे एक कुत्रा आहे त्याचं नाव मेलो असं आहे. त्याच्यासोबत माधुरी मस्ती करतानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर अनेकदा पोस्ट करते. नुकतच राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवसाचं निमित्त साधून माधुरीने एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या माधुरी घरात बसून कथकचा रियाज करत आहे. या रियाजादरम्याने तिने हा व्हिडीओ केला आहे. माधुरीचा पेट डॉग मेलोसोबत माधुरी यात डान्स करतेय. या पोस्टमध्ये माधुरी लिहीते की, “जो नेहमी माझ्यासोबत असतो, जो नेहमी माझं मनोरंजन करतो, माझा आवडता डान्सिंग पार्टनर आणि माझ्या चेहऱ्यावर हास्य आणतो, माझा मेलो कार्मेलो”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Bird watching with Carmelo

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

राष्ट्रीय पाळीव प्राणी दिनानिमित्ताने माधुरीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून प्राणी प्रेमींच्या चेहऱ्यांवर नक्कीच हास्य आलं असेल. 
 
 

Recommended

Loading...
Share