पाहा Video : धकधक गर्ल माधुरीचं वर्कआउट फ्रॉम होम

By  
on  

लॉकडाउनच्या या काळात घरात बसून बराच वेळ हाती आहे. या वेळेचा सदुपयोग बहुतांश लोक करत आहेत. यातच फिटनेस फ्रिक लोकं सध्या घरात बसून वर्कआउट करत आहेत. कला विश्वातील  काही कलाकारांनीही या निमित्ताने फिटनेसकडे लक्ष द्यायला मिळतय.

धकधक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली सौंदर्यवती सुपरस्टार माधुरी दीक्षितही घरात बसून बऱ्याच गोष्टी करत आहे. माधुरी सध्या कुकिंगही करतेय तर कधी कथकचा रियाजही करत आहेत. यातच माधुरने नुकतच घरातच वर्कआउट करायलाही सुरुवात केली आहे. याचा व्हिडीओही तिने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. “सध्या फिट आणि हेल्थी राहणं गरजेचं आहे. जीम बंद असतील तर काय फरक पडतो आपण घरातल्याच गोष्टी वापरुन घरातच वर्कआउट करु शकतो. आपण साधे सोपे व्यायाम करूनही फिट राहू शकतो. हा घ्या माझाही घरातून वर्कआउट केल्याचा व्हिडीओ”
असं म्हणत माधुरीने तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Here’s to hope, positivity & some sweetness in everyone’s life! #HappyEaster to you all️

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

 

 

 

Recommended

Loading...
Share