सध्या करोनामुळे आजूबाजूची परिस्थिती गंभीर असली तरी सामान्य असो किंवा सेलिब्रिटी हे आपापल्या घरी कुटुंबियांसोबत कसा छान वेळ घालवता येईल याकडे लक्ष केंद्रित करत आहेत.त्यासाठी नवनवीन क्ल्पृत्या शोधून काढल्या जात आहेत. पण घरबसल्या धम्माल एन्जॉय करण्यासाठी टिक-टॉक व्हिडीओंचा आधार घेणारेसुध्दा अनेक आहेत. त्यात आता सेलिब्रिटीसुध्दा अपवाद नाही, अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही नुकताच एक भन्नाट टिक-टॉक व्हिडीओ सोशल ममिडीयावर अपलोड केला आहे आणि तोसुध्दा चक्क मराठीत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या शिल्पाच्या टिक-टॉक व्हिडीओमध्ये तिचा पती राज कुंद्रा देखील पाहायला मिळतो आहे. व्हिडीओमध्ये शिल्पा मराठी सुपरहीट सिनेमा ‘धुरळा’ मधील अभिनेत्री सई ताम्हणकरचा जबरदस्त डायलॉग "सुया घ्या...बांगड्या घ्या" हा एकदम हटके अंदाजात राजला ऐकवताना दिसते. तिचा हा जबरदस्त अंदाज पाहताना हसून हसून तुमच्या पोटात दुखणार यात शंका नाही.
@theshilpashetty Mere gaane pe itna “gira hua” reaction diya @therajkundra ne ##patipatni ##comedy ##marathimuser ##funny ##tiktok
मराठी टिक-टॉक व्हिडीओ करण्याची शिल्पाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुध्दा शिल्पाने झी मराठीवरील माझा होशील ना.. या मालिकेच्या शिर्षकगीतावर टिक-टॉक केला होता. तोसुध्दा खुप व्हायरल झाला होता व चाहत्यांनी पसंतीची पावती दिली होती.
१५ फेब्रुवारी रोजी शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा या दाम्पत्याला सरोगसीच्या आधारे कन्यारत्नाचा लाभ झाला. या आधी या दोघांना विहान नावाचा मुलगा आहे. गोंडस मुलीचं नाव शिल्पाने समिषा असं ठेवलं आहे.
.