पुन्हा दिसला अक्षयच्या मनाचा मोठेपणा, सिनेमागृहात काम करणा-यांसाठी अक्षयचा मदतीचा हात

By  
on  

अक्षय कुमारच्या मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे. करोनामुळे आपण आरोग्याशी तर झुंजतोच आहोत पण त्याचबरोबर आर्थिक संकटाला, बेरोजगारीलासुध्दा तितकंच तोंड आता द्यावं लागणार आहे. त्या विळख्यातूनसुध्दा आपल्याला सुटायचं आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीला २५ कोटी व मुंबई पालिकेला वैद्यकीय उपकरणांसाठी ३ कोटी रुपये दिल्यानंत पुन्हा अक्षय मदतीसाठी धावून आला आहे. यावेळेस त्याने सिनेमागृहात काम करणा-या कर्मचा-यांचं वेतन देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. 

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, खिलाडी कुमारने गेटी गॅलेक्सी सिनेमागृहामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा म्हणून सिनेमागृहाच्या मालकाला आर्थिक मदत केल्याचे समोर आले आहे.त्यामुळे तो मालक मोठ्या आर्थिक विवंचनेतून सुटला आहे.

गेटी गॅलेक्सी हे मुंबईतील सर्वात जुने व मोठे सिनेमागृह वांद्रे येथे आहे. येथे प्रेक्षकांची सिनेमा पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होते, पण आता सिनेमागृह बंद असल्याने मालकावर सिनेमागृहातील कर्मचा-यांचा पगार देण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आली. ही माहिती अक्षयला मिळताच मालकाची अडचण भागवण्यासाठी त्वरित त्याने मदत देऊ केली व कर्मचा-यांचा अडलेला पगार देण्यात येण्यास सांगितले. गेटी गॅलेक्सीचे मालक मनोज देसाई यांनीअक्षयचे याबाबत मनापासून आभार मानले आहेत. पण त्यांनी कर्ज काढले असल्याने कर्मचा-यांचा पगार यापूर्वीच जमा झाला होता,पण अक्षयच्या मनाच्या मोठेपणाचं त्यांनी कौतुक केलं. 

एकूणच अक्षय सध्या जपत असलेली सामाजिक बांधिलकी नेहमीच कौतुकाचा विषय ठरतेय. 

Recommended

Loading...
Share