By  
on  

अभिनेता इरफान खानची प्रकृती नाजूक, पुढचे 24 तास व्हेंटिलेटरवर 

प्रसिद्ध अभिनेता इरफान खानची प्रकृती खालावल्याने त्याला मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलय. मंगळवारी सकाळी इरफान खान हा बाथरूममध्ये चक्कर येऊन पडला होता. शिवाय त्याला श्वास घेण्यासाठीही त्रास होत होता. आणि म्हणूनच अस्वस्थ वाटू लागल्याने इरफानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  
मात्र आता इरफान खानची प्रकृती अजूनही नाजूक असल्याची माहिती समोर येत आहे. डॉक्टरांनी पुढील 24 तास त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यास सांगीतले आहे. इरफान खान लवकर बरे व्हावे यासाठी सोशल मिडीयावर त्यांच्या चाहत्यांनी विविध मेसेज पोस्ट केले आहेत. सध्या त्यांना लवकर बरं होण्यासाठी याच चाहत्यांच्या प्रार्थनेची गरज आहे.

मात्र इरफानच्या अधिकृत स्पोकपर्सने नुकतीच यावर माहिती दिली आहे. यात लिहीलय की , "हे खूप निराशाजनक आहे की काहींच्या इरफान खान यांच्या प्रकृतीविषयीच्या चुकीच्या धारणा आहेत. लोकांना काळजी आहे हे खरच कौतुकास्पद आहे. पण हे निराशाजनक आहे की काही सुत्र चुकीच्या अफवा पसरवत आहेत आणि उगाज घाबरवत आहेत. इरफान हा एक मजबूत माणूस आहे आणि तो अजूनही या लढाईशी झुंज देतोय. आम्ही तुम्हाला विनंती करतो की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि चुकीच्या काल्पनीक चर्चांमध्येही सहभागी होऊ नका. आम्ही नेहमीच इरफानच्या प्रकृतीविषयीची माहिती आणि त्याचं स्पष्टीकरण दिले आहे आणि पुढेही तसं करत राहू."
काही दिवसांपूर्वीच इरफान खान यांची आई सईदा बेगम यांचं निधन झाल होतं. इरफानने लॉकडाउनमुळे व्हिडीओ कॉलवरच आईचं अंत्यदर्शन घेतलं.दोन वर्षांपूर्वीच म्हणजे 2018मध्ये इरफानला त्याला त्याच्या आजाराविषयी कळालं होतं. त्याला न्युरो इंडोक्राईन ट्युमर नावाचा आजार झाल्याचं त्याने सांगीतलं होतं. आणि 2019मध्ये उपचार करून इरफान भारतात परतला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive