इरफान खानच्या आठवणीत मिथिलाने गायलं ‘कारवा’चं हे गाणं

By  
on  

अभिनेत्री मिथिला पालकरही इरफान खानच्या निधनाने दु:खात आहे. ‘कारवा’ या हिंदी सिनेमाच्या निमित्ताने मिथिलाने इरफान खानसोबत काम केलं होतं. आणि या सिनेमाच्या आठवणीत मिथिला आहे. या सिनेमात इरफानने शौकत नावाची भूमिका साकारली होती आणि मिथिलाने तान्या नावाची भूमिका साकारली होती.

नुकतच मिथिलाने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत मिथिला गाणं गाताना दिसतेय. हे गाणं दुसरं तिसरं कुठलं नसून ‘कारवा’ सिनेमातीलच आहे. ‘कारवा’चं हे टायटल ट्रॅक मिथिलाने इरफान यांच्या आठवणीत गायलं आहे. या पोस्टमध्ये मिथिला लिहीते की, “ शौकत, हे गाणं मी तुला समर्पित करतेय. नेहमीप्रमाणे गाताना मला संघर्ष करावा लागतोय. पण मी हे गायला शिकलीय फक्त तुला शेवटचं माझ्या बिना का गीतमालातून त्रास देण्यासाठी. जिथे कुठे असशील, आनंदी राहा. खुदा हाफीज...तान्या.”असं लिहीत मिथिलाने ‘कारवा’चं हे सुंदर गाणं गायलयं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy times, happier memories! Rest in peace, Sir. They don't make gems like you anymore.

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

इऱफान खान यांच्यासोबत काम केलेल्या प्रत्येक कलाकाराला त्याच्या जाण्याचं दु:ख आहे. कारण तो फक्त उत्तम कलाकारच नाही तर एक उत्तम माणूसही होता. 
 
 

Recommended

Loading...
Share