शाहरुख, आमिर, प्रियांका, हृतिक सह बऱ्याच बॉलिवुड कलाकारांचा कोरोनाग्रस्तांच्या निधीसाठी कॉन्सर्टमध्ये सहभाग

By  
on  

'आय फॉर इंडिया' या लाईव्ह कॉन्सर्टचं नुकतच आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये बऱ्याच बॉलिवुडकरांचा सहभाग पाहायला मिळाला. लाईव्ह पार पडलेल्या या कॉन्सर्टमध्ये कुणी गाणी गायली तर कुणी डान्स केला. काहींनी जनतेला आवाहन करत कोरोना वॉरियर्सला सलाम केला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. . . #shahrukhkhan #srk #abram #bollywoodactor #Bollywood #IForIndia @iamsrk

A post shared by PeepingMoon (@peeping.moon) on

यात सगळ्यात चर्चेत राहिलेल्या परफॉर्मन्सपैकी होता किंग खान शाहरुखचा परफॉर्मन्स. किंग खानने यावेळी ‘सब सही हो जाएगा’ अशा ओळी असलेलं गाणं गायलं आहे. एवढच नाही तर या गाण्यात शाहरुखचा मुलगा अब्रामही पाहायला मिळतोय. शाहरुख आणि अब्रामला या गाण्यात एकत्र पाहून चाहते चांगलेच खुश झाले आहेत. सोशल मिडीयावर शाहरुखचं या कॉन्सर्टमधील हे गाणं चांगंलच व्हायरल होत आहे. 

याशिवाय परफेक्शनिस्ट आमिर खानही या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. आमिर खान आणि पत्नि किरण राव या कॉन्सर्टमध्ये गाणी गाताना दिसले. ‘जिना इसी का नाम है’ आणि ‘एक ऐसे गगन के तले’ ही गाणी या दोघांनी मिळून गायली.

अभिनेता आणि हँडसम हंक हृतिक रोशनही या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. हृतिक रोशन सध्या पियानो शिकतोय. त्यामुळे या कॉन्सर्टमध्ये पियानो वाजवत त्यानं गाणं गायलं आहे. ‘तेरे जैसा यार कहा’ हे त्याचं आवडतं गाणं त्याने या कॉन्सर्टमध्ये गायलं.

याशिवाय प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे देखील या कॉन्सर्टचा आकर्षणाचा भाग ठरले. प्रियांकाने विजय मौर्य यांची एक कविता यावेळी वाचून दाखवली. तर निक जोनासने एक गाणं या कॉन्सर्टमध्ये गायलं. निकच्या व्हिडीओत प्रियांकाही दिसली. दोघांना या व्हिडीओत एकत्र पाहून चाहते चांगलेच सुखावलेत. 

या बड्या स्टार्सना एकाच कॉन्सर्टमध्ये लाईव्ह पाहणं रंजक होतं. मात्र या मनोरंजक कॉन्सर्टच्या माध्यमातून कोरोना परिस्थितीसाठी या कलाकारांनी निधी जमा केला आहे. बॉलिवुडकरांच्या या उपक्रमाचं सोशल मिडीयावर चांगलच कौतुक होत आहे.  

 

Recommended

Loading...
Share