By  
on  

ऋषी कपूर यांच्या आठवणींना बिग बींनी दिला उजाळा, कॉन्सर्ट व्हिडीओत बोलताना झाले भावुक

नुकत्याच आयोजीत केलेल्या I For India या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये बऱ्याच बॉलिवुड कलाकारांनी सहभाग घेतला होता. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या या कॉन्सर्टमध्ये कुणी गाणं गायलं, कुणी डान्स केला तर कुणी चाहत्यांना घरात बसण्याचं आवाहन केल. मात्र आपल्या मित्राच्या दु:खात असलेल्या बिग बींनी मात्र अभिनेता ऋषी कपूर यांना या कॉन्सर्ट व्हिडीओतून श्रध्दांजली वाहिली आहे. 

ऋषी कपूर यांच्या जुन्या आठवणींना त्यांनी या व्हिडीओत उजाळा दिला आहे. त्यांच्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी या व्हिडीओत सांगीतल्या. ऋषी कपूर यांचं चालणं ऋषी यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यासारखं असल्याचं बिग बी या व्हिडीओत सांगतात. या व्हिडीओच्या शेवटी ऋषी यांच्याविषयी बोलत असताना बिग बी भावुक झाले. याआधीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी ऋषी यांच्या जाण्याचं त्यांना असलेलं दु:ख व्यक्त केलं होतं. बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये ऋषी कपूर आणि अमिताभ यांनी एकत्र काम केलं आहे. शिवाय नुकत्याच आलेल्या ‘102 नॉट आऊट’ या सिनेमातही दोघं एकत्र झळकले होते. 

या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये कित्येक बड्या स्टार्सनी सहभाग घेतला होता. सोशल मिडीयावर या कॉन्सर्टमधील स्टार्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

 
 

Recommended

PeepingMoon Exclusive