ऋषी कपूर यांच्या अभिनयात प्रामाणीकपणा होता – पद्मिनी कोल्हापुरे 

By  
on  

अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनाने संपूर्ण कला विश्व हळहळलं. अभिनेता इरफान खानच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आली आणि कला विश्वाला पुन्हा एक मोठा धक्का बसला. 
ऋषी कपूर यांच्या आठवणींना सोशल मिडीयाच्या माध्यमातून इतर कलाकारा श्रध्दांजली वाहत आहेत. लॉकडाउनमुळे कित्येक कलाकारांना, चाहत्यांना त्यांचं अंत्यदर्शन घेता आले नाही. मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

ऋषी कपूर यांच्यासोबत बऱ्याच सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी देखील सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऋषी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

 

त्या पोस्टमध्ये लिहीतात की, “काय हावभाव आहेत, तुमच्या परफॉर्मन्समध्ये किती प्रामाणीकपणा आहे. उत्कृष्टतेच्या पलीकडे असणारा अभिनेता. तुम्ही सदैव आमच्या हद्यात कायम रहाल. आठवणी खूप आठवणी”
असं म्हणत पद्मिनी यांनी ऋषी कपूर यांना श्रध्दांजली वाहिली. पद्मिनी कोल्हापुरे आणि ऋषी कपूर ही प्रसिद्ध ऑनस्क्रिन जोडी होती. ‘प्रेम रोग’ हा त्यांचा गाजलेला सिनेमा. या सिनेमातील गाणही गाजली होती. 
 

Recommended

Loading...
Share