By  
on  

 पाहा Trailer : शाहरुख खानची वेबसिरीज बेतालचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

लॉक़डाउनमध्ये सध्या विविध प्रकारचं चित्रीकरण बंद आहे. मात्र यातच ज्या वेब सिरीजचे चित्रीकरण लॉकडाउनच्या आधी झालय ते आता या वेब सिरीज प्रदर्शित करत आहेत. यातच आणखी एक थरारक वेबसिरीज प्रदर्शित होत आहे.

किंग खान शाहरुखच्या रेड चिलीज एन्टरेटेन्मेट प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत तयार झालेल्या बेताल या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर स्वत: किंग खान शाहरुखने त्याच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा ट्रेलर हॉरर आणि थ्रिलरचं  संयोजन आहे. ज्याला पाहुन उत्सुकता आणखी वाढली आहे. ही कथा एका गावातली असून यात झॉम्बी हा हॉलिवुड सिनेमांमध्ये दिसणारा प्रकार पाहायला मिळेल.
शाहरुख या ट्रेलरच्या पोस्टमध्ये लिहीतो की, “तुम्ही राक्षसांसोबत युद्ध करण्यासाठी किती लांब जाल? आमची दुसरी वेबसिरीज बेताल, एक हॉरर आणि थ्रिलर कथा आहे, 24 मे रोजी ही प्रदर्शित होईल.” 

 

या वेबसिरीजमध्ये विनीत कुमार, अहाना कुमरा, सुचित्रा पिल्लई, जितेंद्र जोशी, मंजरी पुपला आणि सायना आनंद हे कलाकार आहेत. पैट्रिक ग्राहम आणि निखील महाजन यांनी ही वेब सिरीज दिग्दर्शित केली आहे. अभिनेता जितेंद्र जोशीचीही या सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्येही त्याची झलक पाहायला मिळते. येत्या 24 मे रोजी ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
 

Recommended

PeepingMoon Exclusive