सनी लिओनीनं मुंबईतून थेट अमेरिका गाठली, म्हणते तिथे जास्त सुरक्षित वाटतं

By  
on  

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस देशासह राज्यात वाढतच चालला आहे. येत्या १७ मेपर्यंत लॉकडाऊन काळ वाढवण्यात आला आहे. म्हणूनच ही गांभिर्याची परिस्थिती पाहून बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने आपल्या मुलाबाळांसह थेट अमेरिका गाठली आहे. भारतापेक्षा तिथे जास्त सुरक्षित असल्याचं तिचं म्हणणं आहे. खरं तर अमेरिका, इटली, युनायटेड किंगडम, फ्रान्स, स्पेन सारख्या विकसीत देशांतही लाखो जण मृत्युमुखी पडलेत. पण भारतात मात्र इतकी वाईट वेळ अद्यापतरी आलेली नाही, असं असतानाही सनीने घेतलेल्या या निर्णयाचं आश्चर्च वाटतं. 

भारत सोडून अमेरिका गाठल्याबाबतची इन्स्टाग्राम पोस्ट सनीने अलिकडेच केली.  पती डॅनिअल वेबर व सर्व मुलांसह सनी आता अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील बंगल्यावर वास्तव्यास आहे. तिच्या मते, अमेरिका ही मुलांसाठी जास्त सुरक्षित आहे. 

Recommended

Loading...
Share