By  
on  

 काय असेल नागराज मंजुळेंच्या 'झुंड' सिनेमाचं भविष्य ? ओटीटीवर येणार का सिनेमा ?

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या सिनेमाविषयी नागराज यांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन झळकणार असल्याने ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. नागराज सारखे उत्तम दिग्दर्शक आणि बिग बींसारखे महानायक एकत्र येऊन सिनेमा करत असल्याने त्या सिनेमात नक्कीच काहीतरी खास पाहायला मिळेल यात काडीमात्र शंका नाही. मात्र लॉकडाउनमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालय.

8 मे रोजी याच वर्षी ‘झुंड’ हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं घोषीत करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाचा सुळसुळाट आणि त्यानंतर लॉकडाउन यामुळे या सिनेमाचं प्रदर्शन रखडलं आहे. या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून पोस्ट प्रोडक्शनचं काम मात्र थांबलय.  लॉकडाउननंतर हे काम पूर्ण होईलच. त्यातच आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. 


एकीकडे सध्या सिनेमागृह, चित्रीकरणं हे सगळं बंद असल्याने मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालय. त्यातच विविध बॉलिवुड सिनेमे आता ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. मात्र बिग बींचा हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता असलेला प्रेक्षकवर्ग या चर्चांमुळे नाराज आहे. असं असलं तरी या सिनेमाच्या ओटीटीवर येण्याविषयीची कोणतीच माहिती सिनेमाच्या टीमने अद्याप दिलेली नाही. बिग बींचा ‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमा ओटीटीवर अमेझॉन प्राईमवर येतोय. तेव्हा ‘झुंड’ हा सिनेमाही ओटीटीवरचं प्रदर्शित होणार का याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

 

फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसेच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून या सिनेमाला अजय-अतुल यांचं संगीत लाभलय. याच वर्षी या सिनेमाचा टीझरही प्रदर्शित झाला होता.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive