By  
on  

 तेलुगु अभिनेता निखिल सिध्दार्थ ने लॉकडाउनमध्ये केलं लग्न,  गर्लफ्रेंड पल्लवी वर्मासोबत बांधली लगीनगाठ

तेलुगु अभिनेता निखिल सिध्दार्थ लॉकडाउनमध्ये झालेलं लग्न सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. निखिल ने 14 मे रोजी म्हणजेच गुरुवारी गर्लफ्रेंड पल्लवी वर्मासोबत लग्न केलं आहे. हे दोघही एकमेकांना बऱ्याच कालावधीपासून डेट करत होते. या लग्नात निखिल आणि पल्लवीचा परिवार आणि काही ठरावीक मंडळी उपस्थित होती. निखिल आणि पल्लवीचं हे लग्न 16 एप्रिल रोजी होणार होतं. मात्र लॉकडाउनमुळे या लग्नाची तारीख बदलण्यात आली. त्यानंतर मग 14 मे रोजी लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


या लग्नात निखिल हा सोनेरी रंगाच्या शेरवानीत दिसला. तर पल्लवीने लाल रंगाची सिल्क साडी नेसली होती.


निखिल आणि पल्लवीच्या या लग्नात मास्क आणि सॅनिटाइजरचीही व्यवस्था करण्यात आली होती. 


लॉकडाउन संपल्यानंतर या दोघांनी  फिल्म इंडस्ट्री आणि त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींसाठी रिसेप्शन सोहळा ठेवण्याचही ठरवलं आहे.
 

Recommended

PeepingMoon Exclusive