माधुरीकडून चाहत्यांना रिटर्न गिफ्ट, नव्या सिंगल गाण्याची झलक प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

आज सोशल मिडीयाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात दिसतेय. ती व्यक्ती म्हणजे सुपरस्टार धकधक गर्ल माधुरी दीक्षित. आज माधुरी दीक्षितच्या वाढदविसानिमित्ताने सगळीकडे माधुरीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जिचं सौंदर्य,  अभिनय, नृत्य, हास्य, अदा या सगळ्याच गोष्टी मोहक आहेत त्या अभिनेत्रीवर आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच माधुरीनेही तिच्या चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलय.

 

 माधुरी लवकरच तिचा सिंगल गाणं घेऊन येत आहे. 'कँडल' असं या गाण्याचं नाव आहे. सध्याच्या परिस्थितीत आशेची गरज आहे यावरच हे गाणं असल्याचं ती या पोस्टमध्ये म्हणते. या पोस्टमध्ये या गाण्याची झलक माधुरीने पोस्ट केली आहे. यात माधुरीच्या आवाजासह ती सुद्धा दिसतेय. हे गाणं कधी प्रदर्शित होतय याचीच माधुरीच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. शिवाय माधुरीच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळालेलं हे रिटर्न गिफ्ट त्यांना भरपुर आनंद देऊन गेलय एवढं नक्की. 

नुकतच आय फॉर इंडियाच्या लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रमातही माधुरीने परफेक्ट हे इंग्रजी गाणं गायलं होतं. या गाण्याचं प्रचंड कौतुक झालं होतं. तेव्हा तिच्या अदांवर घायाळ होणाऱ्यांची आता माधुरीच्या आवाजाने धकधक वाढणार एवढं नक्की.
 

Recommended

Loading...
Share