By  
on  

दीपिका पादुकोणने शेयर केली 20 वर्षांपूर्वीची ही आठवण, फोटोत दिसतोय आमिर खान

जेव्हा पासून लॉकडाउनला सुरुवात झाली आहे तेव्हापासून दीपिका पादुकोण तिच्या इन्स्टाग्रावर तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही इंटरेस्टिंग गोष्ट पोस्ट करतेय. आणि दीपिकाने नुकतीच शेयरे केलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे. या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

   या फोटोत दीपिका पादुकोण ही सुपरस्टार आमिर खानसोबत दिसतेय. दीपिका आणि आमिर शिवाय या फोटोत दीपिकाची आई उज्जला पादुकोण, बहिण अनिशा, वडिल प्रकाश पादुकोण दिसत आहेत. हा फोटो 1 जानेवारी 2000 सालचा आहे. त्यावेळी दीपिका फक्त 13 वर्षांची होती.  हा फोटो पोस्ट करत दीपिका या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीते की, “मेजर थ्रोबॅक, मी 13 वर्षांची होते आणि अस्ताव्यस्त जशी अजूनही आहे. ते जेवत होते, सांगायचं झालं तर दही भात खात होते. आणि मी नेहमीप्रमाणे भूकेलेली. पण त्यांनी मला ऑफर नाही केल आणि मी देखील नाही विचारलं.”
 सोशल  मिडीयावर हा फोटो सध्या चांगलाच ट्रेंड होत आहे. आमिर आणि दीपिकाने आत्तापर्यंत ऑनस्क्रिन एकत्र काम केलेलं नाही. त्यामुळे हा फोटो पाहून दोघांनी एकत्र काम करण्याची इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या लॉकडाउनमध्ये थ्रोबॅक पिक्चर्स पोस्ट करण्याचा ट्रेंड सोशल मिडीयावर सुरु आहे. यातच मनोरंजन विश्वातील कलाकारांचे हे जुने फोटो पाहणं रंजक ठरतय. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive