'धकधक गर्ल'च्या स्वरांनी व्हाल मंत्रमुग्ध, माधुरीचे 'कँडल' गाणं रिलीज

By  
on  

धकधक गर्ल माधुरी दीक्षित आत्तापर्यंत तिच्या अदांनी घायाळ करायची मात्र आता तिचा आवाज सगळ्यांना मंत्रमुग्ध करतोय. आय फॉर इंडिया च्या लाईव्ह कॉनसर्ट मध्ये माधुरीने चक्क गाणं गायलं होतं. माधुरीचा हा सिंगींग अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता. आणि तेव्हाच माधुरी तिचं गाणं आणण्याचं ठरवलं. यातूनच 'कँडल' हे गाणं तयार झालं.

सुपरस्टार माधुरी तिच्या चाहत्यांसाठी तिचं हे पहिलं वहिल गाणं घेऊन आली आहे. नुकतच हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. माधुरी स्वतः यासाठी फेसबूक वर लाईव्ह आली आणि तिने हे गाणं लाँच केलं. लॉकडाऊन मध्ये घरात राहूनच माधुरीने हे गाणं चित्रित आणि रेकॉर्ड केलंय.

सध्याच्या कोरोना ग्रस्त परिस्थितीत आशेचा किरण दाखवणारी ही ज्योत  कोरोना वॉरियर्स ना सलाम करतेय. हे चित्र माधुरीचा या गाण्यात पाहायला मिळतंय. एवढंच नाही तर हे गाणं माधुरीने स्वतः लिहिले असून या गाण्याला तिचाच आवाज आहे.

 

पाहा गाणं  -

 

इतकी वर्षे ज्या माधुरीच्या अदांनी प्रेक्षकांना भुरळ घातली तिचा मंत्रमुग्ध करणारा आवाज सध्याच्या परिस्थितीत खंबीर राहण्याची प्रेरणा देत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला माधुरीच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

Recommended

Loading...
Share