By  
on  

या प्रसिद्ध जोडप्याच्या लग्नाला झाली 19 वर्षे पूर्ण, अशी झाली होती पहिली भेट

प्रसिद्ध जोडी रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या लग्नाला नुकतीच 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी त्यांच्या लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. या सुंदर फोटोमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर गोड हास्य पाहायला मिळतय. या फोटोला सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


आशुतोष आणि रेणुका यांची पहिली भेट ही दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या एका सिनेमाच्या चित्रीकरण दरम्यान झाली होती. सिंगर राजेश्वरी सचदेवने त्यांची भेट घालून दिली होती.ज्यावेळी दोघं भेटले होते तेव्हा आशुतोष यांना रेणुका यांच्याविषयीची माहिती होती मात्र रेणुका या आशुतोष यांना ओळखतही नव्हत्या. पहिल्या भेटीतच आशुतोष यांनी रेणुका यांना “मी तुझा मोठा प्रशंसक आहे” असं म्हटलं होतं. आणि हे ऐकून रेणुका आनंदी झाल्या होत्या. रेणुका या आशुतोष यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या आहेत. दोघं पुन्हा एकत्र भेटले ते दिग्दर्शक रवि राय यांच्या दिवाळी पार्टीमध्ये. मात्र यावेळी आशुतोष या पार्टीत पोहचू शकले नव्हते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी रेणुका यांना दिवाळीच्या शुभेच्छा व्हॉईस मेलच्या माध्यमातून पाठवल्या होत्या.

त्यानंतर त्यांचं बोलणं  दररोज होत असे. जवळपस 3 महिने ते बोलत होते. आणि अखेर दोघं पुन्हा भेटले देखील. आशुतोष हे त्यांच्या व्यस्त कामातून रेणुका यांच्याशी बोलत असे आणि त्यांना कविताही पाठवत असे. एके दिवशी रेणुका यांनी आशुतोष यांच्या कविता ऐकून त्यांच्याजवळ प्रेमाची कबुली दिली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

You and I....what a beautiful world....19 years ago today.... love eternal @ashutosh_ramnarayan

A post shared by Renuka Shahane (@renukash710) on

दोघांच्या भेटीगाठी झाल्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी दोघांनी आशुतोष यांचं गाव दमोह येथे लग्न पार पडलं. दोघांना आता शौर्यमन आणि सत्येंद्र ही दोन गोंडस मुलं आहेत. सिनेसृष्टीतील आदर्श जोडींपैकी हे कपल आहे. 

या गोड जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या पिपींगमून मराठीकडून शुभेच्छा.

 

Recommended

PeepingMoon Exclusive