By  
on  

सलमान खानने करोना योध्दे मुंबई पोलिसांना केलं १ लाख हॅण्ड सॅनिटायझरचं वाटप

देशात करोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबईत तर ही संख्या लक्षणीय वाढतेय. सरकारी यंत्रणांसोबतच पोलिससुध्दा अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटतायत. तहान-भूक विसरुन पोलिस उन्हातान्हात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांच्या कामाचे तास अविरत आहेत. आपण या लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहावं म्हणून ते त्यांच्या कुटुंबाला सोडून आपली काळजी घेतायत. पण दुर्देव म्हणजे या करोनाच्या विळख्यात आपले हे रक्षणकर्ताच आता सापडू लागले आहेत. 

म्हणूनच  बॉलिवूड भाईजान सलमान खान पोलिस बांधवांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्याने पोलिसांच्या सुरक्षेसाठी तबब्ल १  लाख सॅनिटायझरच्या बॉटल्सचं वाटप केलं आहे. भाईजानने अलिकडेच  'फ्रेश' हा सॅनिटायझर ब्रॅण्ड लॉंच केला होता. याची किंमत ५० रुपयांपासून ते ५०० पर्यंत आहे. पण पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सलमानने हे सॅनिटायझर १ लाख पोलिसांपर्यंत पोहचवलं आहे, कारण आत्तापर्यंत २००० पेक्षा अधिक पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive