By  
on  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी मानले सलमान खानचे आभार

सध्या सगळीकडे कोरोना व्हायरसविषयी बोललं जातय. यातच यापासून स्वत:ची काळजी कशी घ्यावी याविषयीचे मेसेज पसरत आहेत. यासाठी सर्वात महत्त्वाची आहे ती हाताची स्वच्छता. हातामार्फत हा विषाणू शरीरात जाण्याची शक्यता असते. यावेळी अल्कोहोलचे प्रमाण असलेल्या सॅनिटायझर, हॅण्डवॉशने हात धुण्यासंबंधी आवाहन केलं आहे. 

 

 

पण बाजारात सॅनिटायजरची मागणी वाढल्याने किमतीतही वाढ झाली आहे. यावर दबंग सलमानने  'फ्रेश' हा सॅनिटायझर ब्रॅण्ड लाँच केला होता. याची किंमत ५० रुपयांपासून ते ५०० पर्यंत आहे. केवळ हे करून न थांबता सलमानने हे सॅनिटायझर १ लाख पोलिसांपर्यंत पोहचवलं आहे. त्याच्या याच कृतीसाठी  मुख्यमंत्र्यांनी त्याचं कौतुक करत ‘या पुढाकारासाठी आपले आभार मानतो’, असं म्हटलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive