By  
on  

Exclusive : संगीतकार वाजिद खान यांचं निधन, इरफानच्या शेजारील कबरेत करणार दफन

बॉलिवूडला अनेक प्रसिद्ध गाणी देणा-या साजिद-वाजिद या संगीत दिग्दर्शक जोडी तुटली आहे. प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानं यांचं वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाजिद आजारी होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. तसंच त्यांची किडनी ट्रान्सप्लान्ट सर्जरी झाली असून तीन दिवसांपूर्वीच त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं वृत्त होतं. 

सूत्रांनुसार वर्सोवा येथील दफन भूमीत जिथे इरफान खानची कबर आहे त्याच्या शेजारी संगीतकार वाजिद खान यांचा दफनविधी होणार असल्याची माहिती आहे. संध्याकाली ५ वाजता अजानच्या वेळी त्यांचा दफनविधी पार पडणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive