By  
on  

वाजिद खान यांच्याबाबत सलमान म्हणतो, ‘एक माणूस म्हणून कायमच तुझ्यावर प्रेम राहील...’

अभिनेता सलमान खानने जवळचा मित्र आणि संगीतकार वाजिद खान याच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. वाजिद यांच्या निधनाचा सलमान याला चांगलाच धक्का बसला आहे.कारण अगदी काही दिवसांपुर्वीच वाजिद यांनी सलमानच्या ‘भाई-भाई’ या म्युझिक अल्बमला संगीत दिलं होतं. वाजिद यांच्या निधनाचा शोक व्यक्त करताना सलमान म्हणतो, ‘वाजिद एक माणूस म्हणून माझं तुझ्यावर कायमच प्रेम राहील. तुझी खुप आठवण येईल. तुझ्या सर्वोत्तम आत्म्याला शांती मिळो.’ 

 

 

सलमानच्या अनेक सुपरहिट गाण्याला साजिद वाजिद यांचं संगीत आहे. वाजिद किडनीच्या आजाराने जवळपास 60 दिवस दवाखान्यात होते. काही दिवसांपुर्वीच त्यांची किडनीही ट्रांसप्लांट केली होती. 3 दिवसांपुर्वी त्यांच्यात करोनाची लक्षणंही दिसून आली होती. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता.  वाजिद यांच्या अंतिम यात्रेत केवळ दोन लोकांना परवानगी आहे. अभिनेता इरफान खान यांच्या शेजारी साजिद यांना दफन केलं जाणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive