By  
on  

IFTDA ने केली शूटींग गाईडलाईन बदलण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

करोना संकटामुळे जवळपास दोन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणली. काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्याचे संकेत दिले. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला. 

यासाठी १६ पानांचे गाईडलाईन्स जारी करण्यात आले आहे. यात ६५ वर्षावरील व्यक्तींना शूटींग भागात प्रवेश नाकारण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता IFTDA चे अध्यक्ष अशोक पंडीत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ६५ वर्षावरील व्यक्तींनासुध्दा शूटींग भागात प्रवेश देण्यास मंजुरीबाबत पत्र लिहून मागणी केली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive