By  
on  

दिग्दर्शक रोहित शेट्टीने २ महिने हॉटेल उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुंबई पोलिसांनी मानले आभार

करोना संकटात अनेक मान्यवर सेलिब्रिटींनी आपल्याकडून जितकी मदत होईल तितकी करण्याचा प्रयत्न केला. तसंच करोना योध्द्यांसाठीसुध्दा अनेक सेलिब्रिटींनी मदीतीचा हात पुढे करत आम्ही तुमच्यासोबत आहोत असं म्हणत त्यांचं मनोधैर्य वाढवलं. तहान-भूक विसरुन पोलिस उन्हातान्हात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांच्या कामाचे तास अविरत आहेत. आपण या लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहावं म्हणून ते त्यांच्या कुटुंबाला सोडून आपली काळजी घेतायत. 

पोलिसांची काळजी तितकीच महत्त्वाचं असल्याचं बॉलिवूडच्या एक्शनपटांचा राजा दिग्दर्शक रोहित शेट्टीने दाखवून दिलं आहे. ऑन-ड्युटी पोलिसांसाठी रोहित शेट्टीने शहरात  हॉटेल्सच्या खोल्यांची व्यवस्था केली आहे. त्याच्या या मदतीसाठी मुंबई पोलिसांनी ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत.रोहितच्या या कार्याला सर्वच स्तरांतून सलाम केला जात आहे. खरचं कौतुकास्पदच आहे. आता करोना संकटात २ महिन्यांत १७ खोल्या उपलब्ध करुन दिल्याबदद्ल जुहू पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिका-याने रोहित शेट्टीचे नुकतेच आभार मानले आहे. 

जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस पंढरीनाथ व्हावळ म्हणाले, रोहित शेट्टी यांनी योग्य वेळी केलेली मदत खुप मोलाची आहे. त्यामुळे पोलिसांना खुप हायसं वाटलं. त्यांच्यामुळे करोना संक्रमणापासून ते त्यांच्या कुटुंबियांनासुध्दा दूर ठेवू शकले. 

रोहितने सिंघम, सिंबा असे तुफान सुपरहिट पोलिस ड्रामा सिनेमे प्रेक्षकांसाठी आणले आहेत तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी अक्षय कुमार स्टारर सिनेमा प्रदर्शनासाटी सज्ज असतानाच करोना संकंट राज्यावर ओढवलं. त्यामुळे पोलिस व रोहित शेट्टी हे समीकरण तसं जुनंच. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive