By  
on  

‘वीरे दी वेडिंग’च्या कास्टिंग डायरेक्टरचं २८ व्या वर्षी निधन

‘वीरे दी वेडिंग’ या सुपरहिट सिनेमाचा कास्टिंग डायरेक्टर क्रिश कपूर याचं ब्रेन हॅमरेजमुळे निधन झालं. अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्याने  जगाचा निरोप घेतला . ३१ मे रोजी क्रिशचं निधन झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

क्रिशच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. क्रिशने ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘जलेबी’ या सिनेमांसाठी काम केलं होतं. या सिनेमांमधील भूमिकांसाठी त्याने कलाकारांची योग्य निवड केली होती. क्रिशच्या पश्चात त्याची आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. इतक्या लहान वयात त्याने जग सोडल्याने कुटुंबिय व मित्रपरिवार शोकसागरात बुडाले आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive