By  
on  

‘छोटी सी बात’, ‘खट्टा-मीठा’ फेम दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांनी ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘छोटी सी बात’, ‘खट्टा-मीठा’, ‘बातों बातों में’ असे लोकप्रिय सिनेमे देणारे प्रसिध्द दिग्दर्शक बसू चॅटर्जी यांचं ९० व्या वर्षी निधन झालं आहे. ते  ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व पटकथा लेखकसुध्दा होते. बासू दांच्या जाण्याने सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाल्याचं इंडियन फिल्म अँड टीव्ही डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ट्विटरवर ही दु:खद बातमी  शेअर करत म्हटलं. तसंच ते सदैव आठवणीत राहतील असेही ते म्हणाले. 

 चमेली की शादी, छोटी सी बात, रजनीगंधा, बातों बातों में, मनपसंद, हमारी बहु अलका, उस पार, प्यार का घर  अशा विविध सिनेमांतून बसू यांच्या दिग्दर्शनाचा ठसा उमटला. 

चटर्जी यांनी हिंदीसोबत बंगाली चित्रपटही दिग्दर्शित केले होते. त्यांचे चित्रपट अधिक वास्तववादी समजले जात. 70 च्या दशकात अ‍ॅक्शन चित्रपटांचे युग असताना बासू चटर्जी यांचे सिनेमे वेगळे ठरले. दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांनी छोटी सी बात, रजनीगंधा आणि चितचोर यासारख्या त्यांच्या चित्रपटांचे आपल्या अभिनयाने  सोने केले

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive