By  
on  

सलमानच्या ‘राधे- युवर मोस्ट वाँटेड भाई’ च्या 2 गाण्यांना ‘साजिद-वाजिद’ ने दिलं संगीत

1 जूनच्या मध्यरात्री संगीतकार वाजिद खान यांनी चेंबूरच्या सरना हॉस्पिटरमध्ये शेवटचा श्वास घेतला. मागील दोन महिन्यांपासून वाजिद यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वाजिद आज आपल्यात नसले तरी अनेकार्थाने ते सतत सोबत असणार आहेत ते म्हणजे गाण्यांच्या माध्यमातून. सलमानच्या ‘राधे- युवर मोस्ट वाँटेड भाई’ या सिनेमात त्यांनी 2 गाण्यांना संगीत दिलं आहे. यामध्ये सिनेमाचा टायटल ट्रॅकही आहे. आणि दुसरं रोमॅंटिक गाणं आहे. 


सिनेमाच्या आणखी एका गाण्याला हिमेश रेशमिया यांनी संगीत दिलं आहे. याशिवाय एका आयटम नंबरवर जॅकलिन फर्नांडिस थिरकताना दिसून येईल. राधेचं शुटिंग जवळपास संपलं असून दोन गाण्यांच शुटिंग लॉकडाऊन नंतर करण्यात येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive