By  
on  

इरफान खानची पत्नी सुतापाने शेअर केली भावनिक पोस्ट म्हणते, ‘ मला माहिती आहे हे तुझ्याकडून माझ्यासाठी आहे’

गुणी अभिनेता इरफान 28 एप्रिलला हे जग सोडून गेला. यावेळी त्याची पत्नी सुतापा अनेकदा त्याच्या आठवणी सोशल मिडियावर शेअर करत असते. यावेळी सुतापाने एक भावनिक मेसेज शेअर केला आहे . सुतापाने पावसाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला ती म्हणते, ‘मला माहिती आहे हा पाऊस तुझ्याकडून माझ्यासाठी आहे. हा माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचला आहे. हा पाऊस तुला आणि मला एकत्र आणत आहे.’ 

 

तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये इरफान नदीकिनारी पोहताना दिसून येत आहे. त्याच्या चेह-यावर कमालीचा आनंद दिसत आहे. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही इरफानने आपल्या अभिनयाने खास ओळख निर्माण केली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive